ताज्या घडामोडी

बाबाजानी दुर्रानी साहेब यांनी वाघाळा ग्रामस्थांनी आदिवासी समाजाच्या लोकांना भेट

पाथरी प्रतिनिधी अन्वर खान आज दिनांक ०५/०८/२०२१ विधान परिषदेचे आमदार मा. बाबाजानी दुर्रानी साहेब यांनी वाघाळा ग्रामस्थांनी आदिवासी समाजाच्या लोकांना भेट दिली व रस्ता पक्क्या स्वरूपात तयार करू आणि आदिवासी विकास योजनेतून सर्व योजनांचा लाभ देऊ तसेच अतिवृष्टीत पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे लवकर होतील व वाघाळा ,

विटा ,लिंबा रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात येईल व वाघाळा गावासाठी विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले आहे. गावात राबवत असलेल्या वृक्ष लागवड

मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला व उपस्थित वाघाळ्याचे सरपंच भागवतराव घुंबरे उर्फ बंटी पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी चे संचालक दत्ताराव मायंदळे व ग्रामपंचायत सदस्य बालु पवार, शिवाजी पवार आणि गावकरी उपस्थित होते

Share now