आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

बिड जिल्हातील मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.

बिड जिल्हा प्रतिनिधी. अल्पसंख्याक विभागाच्या शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी, दि. ११ नोव्हेंबर रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनापासून अर्ज स्वीकारले जात आहे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार असून या कार्यालयांचे पत्ते व संपर्क महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध आहेत. या महामंडळाच्या वतीने अल्पसंख्यक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जा सह उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी कर्जस्वरुपात उपलब्ध झाला असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहन मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाअध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केले आहे.

सदरील अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्याक अधिकार दिनी कर्ज वाटप करण्यात येणार आहे.
मुदत कर्ज योजनेसाठी पहिल्या गटात २० लाख तर दुसऱ्या गटात ३० लाख रुपयांची कर्जमर्यादा असून उत्पन्नाची मर्यादा शैक्षणिक कर्ज योजनेप्रमाणेच निश्चित केली आहे. तर सूक्ष्म पतपुरवठा योजनेत पहिल्या गटात प्रत्येक सदस्य एक लाख रुपयांप्रमाणे २० सदस्यांच्या एका गटास २० लाखांपर्यंत तर दुसऱ्या गटात प्रत्येकी सदस्य दीड लाखाप्रमाणे २० सभासदांना ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा आहे. या योजनेची उत्पन्न मर्यादादेखील शैक्षणिक मुदत कर्ज योजनेसारखीच आहे.

सदरील योजनेसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, चेक, कोटेशन, जमीनदाराचे कागदपत्रे सह इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन बीड जिल्हा कार्यालयांमध्ये जमा करावे व अधिक माहिती साठी महामंडळाचे बीड जिल्हा व्यवस्थापक श्री इम्रान कादरी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाअध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केले आहे. काही अडचण आल्यास बीड जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांनी मौलाना आझाद युवा मंच च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवहान करण्यात येत आहे.

Share now