बिलोली येथील इदगाहचे बांधकाम त्वरीत सुरु करा;ऑल इंडिया तंजिम ए इंसाफची मागणी
बिलोलीः प्रतिनीधी.बिलोली येथील इदगाहचे बांधकाम त्वरीत सुरु करा अशी मागणी नगर परिषद बिल़ोली यांच्या कडे ऑल इंडिया तंजिम ए इंसाफच्या वतीने न.प अधिक्षक टिकार मॅडम यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.बिलोली शहर व तालुक्यातील मुस्लिम समाज रमजान ईद व बकरी ईद नमाज ईदगाह येथे जाऊन अदा करण्याची प्रथा आहे.
सदरील ईदगाहचे ओटा, पायऱ्या व पिण्याच्या पाण्याची इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची जुनी मागणी होती. मागील सहा महिन्यापुर्वी ईद च्या दिवशी ईदगाहाचे बांधकाम भूमिपुजन मोठ्या थाटात करण्यात आले होते. सहा महिने लोटले असुन अद्यापही ईदगाह चे काम पुर्ण झाले नाही. जवळपास एक कोटीचे बांधकाम आहे. बांधकाम कोणत्या कारणामुळे रुकले आहे ? बांधकाम कधी पुर्ण होणार? ईद आली की इदगाहाची आठवन येते नंतर विसरून जातात.आता मुस्लिम समाज खपवुन घेणार नाही. ईदगाहचे काम लवकर करायचे नाही तर ईदच्या दिवशी नारळ फोडण्याची घाई कशाला केली
मुस्लिम समाजाचे लांग लुच्चन करू नये. गेल्या १५ वर्षा पासून मुस्लिम समाजाला आश्वासनांची खैरात दिली जात आहे. मुस्लिम समाजाचे काणतेही विकास कामे केलेली नाहीत .फक्त मुस्लिम समाजाचे मते पाहिजे असे मुस्लिम समाजाकडुन बोललं जातं आहे .त्वरीत ईदगाह बांधकाम जलद गतीने सुरु करण्यात यावे. अशी मुस्लिम बांधवाची मागणी आहे. तसेच क्रिडा संकुलनाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासुन कासव गतीने सुरु आहे. ते काम त्वरीत पुर्ण करुन बिलोली शहरातील
मुलांना खेळ खेळण्यासाठी क्रिडा संकुल त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावे. अन्यथा दि. १५.१२.२०२२ अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा ईशा निवेदन देण्यात आले. निवेदनावर ऑल इंडिया तंजिम एक इंसाफचे बिलोली तालुकाध्यक्ष ए.जी. कुरेशी, ता.सचिव सय्यद रियाज, शेख पाशा भाई, रफीक इनामदार ,साबेर पटेल, इलियास फारुखी ,शेख मुश्ताक आदिच्या स्वाक्षऱ्या आहे