क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील वृध्द महिलेचा गळा दाबून खून.

पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे घटनास्थळी भेट

भोकरदन प्रतिनिधी :- भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील गढीवर राहणार्या वृध्द महिला पार्वतीबाई रंगनाथ शिंदे ( वय ७५ ) यांचा राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत दि.१८ रोजी सकाळी मृतदेह आढळून आला होता.नातेवाईकांनी मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला होता.

उत्तरीय तपासणीच्या वेळी वृध्द महिलेचा गळा कशानी तरी आवळ्याचे खुणा आढळुन आल्या याप्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करुन भोकरदन पोलिसांनी गतीने सुत्रे हलवून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणेला सुचना दिल्या आहेत.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सहायक पोलीस निरीक्षक महंतरत्नदीप जोगदंड यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.यासंदर्भात संशयास्पद व्यक्तीची चौकशी करण्यात येत असल्याचे समजते.

Share now