ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

भोकरदन येथे महावितरणवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा धडक

मोर्क

शेतकर्‍यांना वेठीस धरल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही आ.चंद्रकांत दानवे

भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील शेतीच्या कृषीपंपांची वीज कट करण्याच्या शासन व महावितरण कंपनीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शेतकऱ्यांचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. असे प्रतिपादन मा.आ.चंद्रकांत दानवे यांनी मोर्चास संबोधीत करतांना केले. याविषयी अधिक माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील कृषीपंपांची वीज खंडीत करण्याची कार्यवाही महावितरण कंपनीने सुरु केली होती. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महावितरण कंपनीच्या उपविभागिय कार्यालयावर भोकरदन तालुक्यातील शेतकरी,शेतमजुर व गायरान तसेच गावठाण हद्दीतील बांधकाम पाडण्यासाठी प्रशासनाद्वारे नोटीस देण्यात आलेल्या असून यावेळी

अतिक्रमण बाधीत घरांचे सरंक्षण देण्यात यावे यासाठी देखील अतिक्रमण बाधीत गरीब कुटुंब देखील आंदोलनात सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय भोकरदन येथुन पायी चालत जात मोर्चेकरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरषांना अभिवादन करत महावितरण कार्यालयावर धडकले. यावेळी मा.आ.चंद्रकांत दानवे,युवानेते सुधाकर दानवे,मेशशेठ सपकाळ,प्रा. डॉ.अंकुश जाधव,शब्बीर कुरेशी,संग्रामराजे देशमुख,अशोकराव पवार,पी.पी.पवार आदिनी मोर्चास संबोधीत केले.

यावेळीउपविभागिय अधिकारी,मा. उपविभागिय पोलिस अधिकारी तसेच कार्यकारी उपअभियंता महावितरण कंपनी भोकरदन यांना निवेदन देण्यात आले.तसेच महापुरुषांची बदनामी करणाऱ्या सर्व वाचाळविरांवर देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी मोर्चामध्ये शंकर भुते,शहराध्यक्ष नईम कादरी,नगरसेवक अब्दुल कदीर बापू, अजहर शहा, नसीम भाई पठाण,शमीमभाई मिर्झा, जुमान चाऊस,प्रल्हाद पा.गोरे, रामदास रोडे,भूषण लव्हाळे, प्रभाकर लुटे, अरशद पठाण,कडुबा तात्या देशमुख,सारंगधर भोंबे,वर्धमान शेठ

वास्कर,नाना पा.तांगडे,रामशेठ बावस्कर,अनिल शिंदे,अनिल पा.गावंडे,रामेश्वर पा. जंजाळ,मुदत्सर पठाण,पुंजाराम साबळे,अवचितराव देठे,सुनील लोखंडे,प्रकाशजी जगताप,सय्यद आरेफ तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.चौकळ तालुक्यात सर्वच अवैध धंदे बोकाळले : मा.आ.दानवे अधिकाऱ्यांचे मोबाईल सी.डी.आर. काढून चौकशी करावीतालुक्यात रेशनचे धान्य सामान्य जनतेपर्यंत न पोहचता काळ्या बाजारात रोजरोसपणे हप्ते घेऊन विक्री करण्यास मदत करत आहेत.संबंधीत विभागातील कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून तालुक्यातील जनतेस न्याय देण्यात यावा.

तसेच तहसिल कार्यक्षेत्रात वाळू, मुरूम, दगड आदी गौण खनिजाचे अवैध उत्खनन थांबविण्यात यावे.व भोकरदन तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले असून भोकरदन पोलीस स्टेशनच्या समोरच हाकेच्या अंतरावर सट्टा,मटका सुरु आहे.तर तालुक्यामध्ये दारू विक्री, गांजा,गुटखा जुगार अड्डे आदी अवैध धंदे खुलेआम सुरु असून पोलीसांच्या मर्जीशिवाय अवैध धंदे करणे शक्य नसल्याने भोकरदन तालुक्यातील सर्व पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांचे मोबाईल सी.डी.आर. काढून चौकशी करावी व दोषींवर निलंबनाची कार्यवाही करावी.

भोकरदन तालुक्यातील वाळू मुरूम व दगडांचे अवैध उत्खनन केले जात असून महसूल व पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.अवैध उत्खनन थांबवून शासनाच्या गौण खनिजाचे जतन करण्यात यावे अशी मागणी ही मा.आ.चंद्रकांत दानवे यांनी निवेदाद्वारे केली आहे.फोटो ओळी : भोकरदन : राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून महावितरण कंपनीच्या व विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पप्पुलवाड यांना देताना मा.आ.चंद्रकात दानवे व युवा नेते सुधाकर दानवे व मान्यवर उपस्थित होते

Share now