आम मुद्देताज्या घडामोडी

मन्नाथ, हरंगुळ यात्रेसाठी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणी

आदमी पार्टीचा पुढाकार मन्नाथ, हरंगुळ यात्रेसाठी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणी

गंगाखेड प्रतिनिधी. श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र मन्नाथ व नागपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र हरंगुळ या ठिकाणी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे यांचे नेतृत्वाखाली गुरुवारी गंगाखेड आगार प्रमुखांना लेखी

निवेदनाद्वारे करण्यात आली. श्रावण महिना आगामी आठवड्यात सुरु होत आहे. श्रावण सोमवारी गंगाखेड परिसरातील भाविकांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीक्षेत्र मन्नाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. यात बालके, महिलांचाही सहभाग असतो. गंगाखेड लातूर

रोडवर असलेल्या श्रीक्षेत्र मन्नाथ येते जाणाऱ्या भक्तांसाठी गंगाखेड शहरातून यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करावी व या मार्गावरील सर्व बसेसना विनंती बस थांबा द्यावा. अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर मराठवाड्यातील सर्वात प्रसिद्ध यात्रा असलेल्या राजा भर्तरीनाथ महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी हरंगुळ येथे

नागपंचमीच्या दिवशी लाखो भाविक जमतात. या भाविकांना दर्शनासाठी गंगाखेड येथून यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यात्रा स्पेशल बस सेवेमुळे आगाराचे उत्पन्न वाढणार असून ज्येष्ठ नागरिक बालकांनाही दर्शनाची संधी या निमित्ताने मिळणार आहे. या निवेदनावर आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, ह भ प रामायणाचार्य रोहिदास महाराज

मस्के, हरंगुळ चे सरपंच बबन पठाण, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले पाटील ,वागलगावचे माजी सरपंच नारायणराव घनवटे ,सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे ,विक्रम बाबा इमडे,बालासाहेब भोसले ,रवीकुमार बर्वे ,श्रीधर सातपुते, किशोर खाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत . दोन्ही ठिकाणी बस सेवा सुरू झाल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे.

Share now