आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

मराठा समाजाला आरक्षण मिळणे हिच खऱ्या अर्थ

मराठा समाजाला आरक्षण मिळणे हिच खऱ्या अर्थाने मेटे साहेबांना श्रद्धांजली ठरेल – मराठा भुषण लबडे महाराज


संपादक अहमद अन्सारी. शेवगाव : शेवगाव येथे आज विनायकराव मेटे साहेब यांची अस्थीकलश यात्रा आली असता शेवगाव येथील सर्व पक्षीय व सर्व संघटनेच्या वतीने अस्थी पूजन व श्रद्धांजली वाहण्यात आली.
सरकारने आत्ताही आरक्षण नाही दिले तर मराठा आरक्षणाची लढाई आणखी बुलंद करुन आरक्षण देण्यास सरकार ला भाग पाडणे हीच विनायकराव मेटे साहेबांना श्रद्धांजली ठरेल


मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आले असताना विनायकराव मेटेसाहेब यांचे निधन दुर्दैवी आहे.त्यांच्या जाण्याने आरक्षणाची ही चळवळ थांबणार नाही किंबहुना ती अधिक बुलंद होईल त्यासाठी समाजाने ताकद एकवटली पाहिजे अशी अपेक्षा शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष सुरेशराव शेटे यांनी व्यक्त केली.


यावेळी आपले विचार मांडताना आरक्षण म्हणजे सामाजिक भिक नाही तर सामाजिक प्रतिनिधित्व हक्क आहे. प्रतिनिधित्व जे शिक्षण, नोकरी, व्यवसाय,राजकारण यामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका प्रतिनिधित्व करणे म्हणजे आरक्षण आहे.जेव्हा मराठा समाजाला आरक्षण व मेटे साहेबांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता ते सरकारने पुर्ण करावे

तीच खरी विनायकराव मेटे श्रद्धांजली असेल असे विचार लबडे महाराज यांनी श्रद्धांजली वाहताना मांडले.यावेळी वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष वाळके महाराज शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष सुरेशराव शेटे, तालुका अध्यक्ष नवनाथ इसारवाडे, शिव अभिषेक समितीचे संस्थापक अध्यक्ष मराठा मराठा भुषण चंद्रकांत महाराज लबडे,मराठा महासंघाचे संस्थापक डाँ कृषिराज टकले,मनसे तालुका अध्यक्ष गणेश रांजवणे, शेतकरी संघटनेचे

दत्तात्रय फुंदे,वंचित बहुजन चे तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाईशेख,सुनील रासने,विक्रम दारकुंडे, गवळी सर,विजयराव देशमुख, डॉ लांडे, विष्णू घनवट,अंकुश डांभे, संदिप बामदळे,सुरेश लांडे, विकास गटकळ अभय गोरे, चैतन्य घोडेचोर,दिनेश वाणी यांच्या सह असंख्य मेटे साहेबावर प्रेम करणारे उपस्थित होते.

Share now