Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

माजी. खा. खतगावकराच्या चौफेर फटकेबाजी के.पी. ट्रॅक्टर्सचे थाटात उद्घाटन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सय्यद अजीम नरसीकर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या विनोदी शैलीतील चौफेर चौफेर फटकेबाजीने मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिव श्री. कामाजी पाटील पवार यांच्या नरसी येथे सुरू करण्यात आलेल्या के.पी. ट्रॅक्टर्सचे कार्यक्रमाचे उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले.

माजी खासदार खतगावकर यांनी आपल्या भाषणातून कंही पे निघाले कंही पे निशाना… या ऊक्ती प्रमाणे आमदार राम पाटील रातोळीकर हे नशीबवान आहेत. माणसाच्या जीवनात काही गोष्टी नशिबानेच मिळतात तशी रातोळीकराना विधानपरिषदेत संधी मिळाली.नाहीतर बहुसंख्येने मित्र जमवण्याच्या भगवानराव भिलवंडे यांना साधी जिल्हापरिषद ही जिंकता आली नाही

म्हणून काही गोष्टी नशिबानेच मिळत असतात, तसे अमचे जावाई कामाजी पाटील आहेत. त्यानीही असल्या आयुष्यात अपार मेहनत घेऊन कुटुंब, नौकरी, सांभाळत मराठा समाजासाठी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता व ख्याती समाजात चांगली आहे अर्थातच त्यांनी निवडलेला व्यवसाय ही लोकाभिमुखच आहे. त्यामुळे त्यांचे सर्विस सेंटर महाराष्ट्रात अव्वल असेल यात शंका नसल्याचेही ते म्हणाले, यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वसंत चव्हाण, उद्घाटक माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,

आ. राम पाटील रातोळीकर, माधवराव पाटील शेळगावकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, भाजप नेते राजेश कुंटूरकर, श्रावण भिलवंडे, बालाजी बच्चेवार, श्रीनिवास पाटील चव्हाण, इंजिनिअर दत्तू पाटील पवार, माधव अप्पा बेळगे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी भिलवंडे, दत्ताहरी चोलाखेकर, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे, नरसी नगरीचे सरपंच गजानन भिलवंडे, भास्कर भिलवंडे, हणमंतराव चव्हाण, दिलीप मदेवाड, माणिक लोहगावे, दिलीपराव धर्माधिकारी, उद्धवराव सुर्यवंशी, केशवराव पाटील चव्हाण, तहसीलदार नरवाडे, संकेत पाटील, डॉ.जिवन चव्हाण, श्रीधर पाटील चव्हाण, बाबासाहेब शिंदे, सदाशिवराव पाटील इंगोले, बाबासाहेब शिंदे, फार्मट्रक ट्रॅक्टर कंपनीचे कर्मचारी भालचंद्र माने, रविंद्र कदम, दत्तात्रय पावडे, ब्रेकनंतर चढ्ढा, फिरोज खान, बिराजदार सर, मसूद देशमुख,काँग्रेस अल्पसंख्या इसाक शेठ नरसीकर,

मारोती भिलवंडे, गणेश गाडे, डॉ. मधुकर राठोड, एन.डी. पवार, विलास पवार, प्रकाश कवळे, साहेबराव पवार, राजू गंदिगुडे, विशाल चव्हाण, ताटे सर, आदींसह के.पी.ट्रॅक्टर्सचे मालक चालक शिव श्री कामाजी पाटील पवार,राजेश पाटील मोरे, उद्धवराव पवार, देविदास पवार, डॉ. विश्वंभर पवार, नवनाथ शिंदे,संजय पाटील मोरे, उमेश पाटील अडलूरकर, आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले,सर्व गावातील नागरिक पत्रकार बंधू आदी जण उपस्थित होते.

Share now