आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

माधव नागरगोजे स्थायी निधी संचालक महाराष्ट्र शासन यांची साई जन्मस्थान मंदिरास भेट

स्थायी निधी संचालक महाराष्ट्र शासन यांची साई जन्मस्थान मंदिरास भेट

पाथरी येथील. स्थायी महाराष्ट्र शासन स्थायी निधी संचालक माननीय श्री माधव नागरगोजे यांनी साईबाबांचा पवित्र जन्मभूमीस भेट दिली. त्यांच्यासोबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माननीय कोमल सावरे मॅडम तसेच नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. श्री साई स्मारक समिती पाथरीचे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त अॅड.

अतुलराव चौधरी यांनी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. तसेच माननीय सवरे मॅडम यांनी श्री साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.”श्रीसाईनाथ जन्मभूमीस्थानास दर्शनाचा योग, दीपावलीच्या महापर्वात, महतभाग्य, येथील व्यवस्था व पायाभूत सुविधा बाबत संस्थान व नगरपरिषद द्वारा प्रस्तावित विकास आराखड्यास व कार्यास हार्दिक शुभेच्छा” असे विचार प्रगट केले.प्रसंगी समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन के कुलकर्णी उपस्थित होते अशी माहिती मंदिर प्रमुख छाया कुलकर्णी यांनी दिली

Share now