आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

मानवतरोड परळी रेल्वेमार्गाचा दखल घ्या आमदार बाबाजानी दुर्राणी. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन.

दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मानवतरोड – परळी रेल्वेमार्गाचा प्रश्न मांडला

दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मानवतरोड – परळी रेल्वेमार्गाचा प्रश्न मांडला.2016 च्या रेल्वे बजेटमध्ये मानवत रोड ते परळी या नव्या रेल्वेमार्गाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली. या नव्या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पास प्रगतीपथावर आणण्यासाठी सहकार्य करण्याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन एका पत्राद्वारे विनंती केली.2016 साली मी बिहारचे तत्कालीन

राज्यपाल व सध्या भारताचे महामहिम राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद साहेबांना मानवत रोड ते परळी या महामार्गाला मंजुरी मिळावी, यासाठी निवेदन दिले होते. स्वतः राष्ट्रपतींनी याबाबत संबंधित विभागाला सूचना देऊन या मार्गाला मंजुरी मिळवून दिली.त्यानंतर त्यावर कार्यवाही होऊन त्यावेळच्या रेल्वे बजेट नुसार मानवत रोड ते परळी व्हाया मानवत-पाथरी-सोनपेठ-परळी या मार्गावरील 62 किलोमीटर नव्या रेल्वेमार्गाचा सर्व्हे करण्यासाठी 10 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. या निधीच्या माध्यमातून दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद यांच्यामार्फत मानवत रोड ते

परळीपर्यंतच्या रेल्वेमार्गाचा सर्व पूर्ण करून याचा अहवाल 2018 साली निर्माण कार्याचे कार्यकारी संचालक, रेल्वे बोर्ड, रेल्वे भवन, दिल्ली यांना सोपवला.देशाचे वर्तमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना पाथरी साई संस्थानचे अध्यक्ष सीताराम धानु व आमदार या नात्याने मी मानवत रोड ते परळी रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी निवेदन दिले होते. सन्माननीय रामनाथ कोविंद साहेबांनी 19 फेब्रुवारी 2016 साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहेबांना या रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी सूचनेचे पत्र दिले.या सर्व गोष्टींच्या संदर्भाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर याविषयी सांगितले व हे काम प्रगती पथावर आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली.

Share now