क्राईमताज्या घडामोडी

मानवत मध्ये दुचाकी ची धडक एक जण ठार. एक गंभीर जख्मी

मानवत:- मधून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर 15 नोव्हेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास राघवेंद्र जिनिंग समोरील पुलावर मानवत येथील रहिवाशी असलेले रामकिसन सोनवणे यांना दुचाकी क्रमांक एम.एच.ए.वाय. 4228 ने जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाला.

रामकिसन सोनवणे हे जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली.या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषीत केले.

तसेच धडक देणारा दुचाकीस्वार सलमान शेख हा सुध्दा गंभीर जखमी झाला असून त्यास परभणी नंतर नांदेड ला हलविल्याचे वृत्त आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी, पोलीस नायक मुनू शेख, नारायण सोळंके यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Share now