मानवत येथे केंद्री सरकारच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन
केंद्री सरकारच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन मानवत
संपादक अहमद अन्सारी. मानवत. येथील तालुका कांग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करत तहसीलदार प्रशासनाला नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले अतिवृष्टीमुळे ओल दुष्काळ जाहीर करुन हेक्टर ७५ हजारांची अर्थीक मदत द्यावी.या वर्षाचे पीककर्ज माफ करावे फळबागायतदारांना मदत द्यावी खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या जमीनीसाठी ठोस मदत द्यावी.

शेतक-यांच्या पाल्यांचे यावर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी केली. यावेळी कांग्रेस तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर लाडाने, शहरध्यक्ष श्याम चव्हाण, बाबुराव नागेशवर, बाबासाहेब अवचार, आसाराम काळे, बालासाहेब फुलारी, बालासाहेब भांगे, श्रीधर धोपटे, आनंद भदर्गे, अजय तळेकर, प्रभाकर तळेकर, मुंजाभाऊ भिसे, साहेबराव पाते, ज्ञानोबा शिंदे आदी उपस्थित होते.