मानवत येथे दांडिया, गरबा व नृत्य महोत्सवाचा समारोप
परभणी जिल्ह्यातील मानवत येथे दांडिया, गरबा व नृत्य महोत्सवाचा
संपादक अहमद अन्सारी. मानवत येथील मैत्री ग्रुपच्या वतीने शारदा नवरात्र महोत्सवा निमित्त दांडिया, गरबा , नृत्य कार्यक्रम शहरातील श्री रेणुका मंगल कार्यालयात पार पडला.शहरातील मैत्री ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या
दोन दिवशीय दांडिया, गरबा व नृत्य कार्यक्रमास शहरातील १०० महिलांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सर्वांना बक्षीस वाटप करण्यात आले. दोन दिवसीय चाललेल्या कार्यक्रमां मध्ये आलेल्या महिला प्रेक्षकांनी दांडिया, गरबा, नृत्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमां मध्ये पहिल्या दिवशी सर्व महिलांनी घागरा तर दुसऱ्या दिवशी आंध्रालुक पोशाख परिधान करण्यात आला होता.
दोन दिवसीय संपन्न झालेल्या कार्यक्रमां मध्ये प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता झाडगावकर, सुवर्णा महाजन, मीनाताई देशमुख, लक्ष्मीताई खक्के, विजया बांगड, सरोज गुंडू,आरती मंत्री व मैत्री ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमास शहरातील हजारो महिला उपस्थित होते.