मानवत येथे होमगार्ड पथकाकडून मानवत शहरात तिरंगा ध्वज रॅली
होमगार्ड पथकाकडून मानवत शहरात तिरंगा ध्वज रॅली
संपादक अहमद अन्सारी भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवा निमित्त मानवत येथील होमगार्ड पथकाकडून शहरात तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली . होमगार्ड पथक मानवत येथील तालुका समादेशक रामेश्वर काष्टे यांचे मार्गदर्शनाखाली व सुरेश निलवर्ण यांचे नेतृत्वात आज मानवत शहरातील मुख्य रस्त्याने महाराणा प्रताप चौक ते नगर परिषद कार्यालया पर्यंत तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व होमगार्ड जवानानी तिरंगा ध्वज फडकावत , भारत माता की जय घोषणा देत संपूर्ण

मार्गावरील वातावरण चैतन्यमय केले. रॅलीमध्ये होमगार्ड संघटनेची शिस्त व नियमांचे पालन कसे केले जाते, याविषयी जनतेला माहिती मिळाली. सदर रॅलीमध्ये पथकातील जवळपास सर्वच महिला व पुरुष होमगार्ड रॅलीमध्ये सहभागी झाले होते , सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होमगार्ड अशोक माकुडे , नितिन ढाले , शेख अल्फेस , गणेश वाघमारे , उत्तम धबडगे यांनी परिश्रम घेतले.