मुसळधार पाउसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी
सोमवार व मंगळवार रोजी झालेल्या मुसळधार पाउसमुले गंगाखेड़ शहरातील रमाबाई नगर,आझादनगर,तारू मोहला, बरकत नगर,रजा कॉलोनी मध्ये व इतर ठिकाणी घरामध्ये पानी घुसल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले.जगण्यासाठी जो अन्न,वस्त्र,निवारा लागतो तेच या पाउसाने घेतला यामुळे झालेल्या नुकसानची जाउन पाहणी करून पंचनामे करावे व नुकसानची भरपाई द्यावी अशा मागनीचे निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गंगाखेड़ तर्फे तहसीलदार साहेबास देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जमीरभैया, कृष्णा दलनर,तबरेज आलम,शफीक तंबोली,सचिन खदारे,भक्तराज कुंडगिर,कुलदीप जाधव,सय्यद सोहेल, सय्यद समीर,सोहेल शेख,अजहर शेख,वेंकटेश भेंडेकर,नाजेर शेख उपस्थित होते.