मोबाईल बॅटरीच्या उजेडात करावी लागली महिलेची प्रस्तुती
डीपी बंद असल्याने घडला प्रकारमोबाईल बॅटरीच्या उजेडात करावी लागली महिलेची प्रस्तुती
गंगाखेड प्रतिनिधी. प्रस्तुती वेदना जाणवत असल्याने दवाखान्यात आणलेल्या महिलेची प्रस्तुती लाईट नसल्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडावर करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घडला. मंगळवारी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी निवेदन देत हा डीपी तात्काळ बसवावा अशी मागणी केली आहे.

महातपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास विद्युत पुरवठा करणारा महावितरण चा डीपी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतच आहे. पण मागील सहा दिवसापासून तो डीपी नादुरुस्त आहे. हा डीपी दुरुस्त केला जावा यासाठी मागील पाच दिवसापासून गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख मुस्तफा, शेख अमजद, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वाळवटे, दीनानाथ घिसडे आदींनी महावितरण अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला होता. पण महावितरणच्या अधिकाऱ्याकडून कसलीही दाद दिली गेली नाही .
डीपी बंद असल्याचा रिपोर्ट तुम्ही स्वतः परभणीला घेऊन जा मगच डीपी येत असे उत्तर अधिकारी ग्रामस्थांना देत होते .याच प्रकारात गावातील एका महिलेस प्रस्तुती साठी दवाखान्यात आणण्यात आले. इन्वर्टरची कॅपॅसिटी संपल्याने तेही चालत नव्हते. नाईलाजाने या महिलेची प्रस्तुती उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईल बॅटरीच्या उजेडावर करावी लागली .हा डीपी बंद असल्याने जिल्हा परिषद शाळेतील पाण्याचा बोरही बंद असल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने स्वच्छ पाणी
मिळायचे बंद झाले. गावात 33 केव्ही उपकेंद्र असूनही कायमस्वरूपी लाईनमेन अभावी वीज पुरवठा खोळंबला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना या विषयात लक्ष घालावे अशी विनंती केली. बोबडे यांनी मंगळवारी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या कार्यालयास लेखी निवेदन देऊन विजापुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण ला आदेशित करावे ही विनंती केली. या निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर ,राहुल साबने आदींच्या स्वाक्षरी आहेत. महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ बने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दवाखान्यात अंधार असल्याची कबुली दिली.