ताज्या घडामोडीमनोरंजन

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या शिफारस अनुसार पाथरी तालुका प्रमुख दिपक खुडे यांची निवड

पाथरी येथील महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या शिफारस अनुसार पाथरी तालुका प्रमुख दिपक खुडे यांची निवड निवड करण्यात आली आहे व अंगिकृत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पाथरी तालुका प्रमुख पदी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू , बापूराव काने व रामदास खोत यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली आहे . आपणांस यापुढे प्रहार संघटनेची ध्येय धोरणे , शासनाच अपंगासाठी असणाऱ्या योजना , बेरोजगारी , अपंगाचे राजकीय , सामाजिक पुनर्वसन आदी प्रश्नावार संघटनेच्या

माध्यमातुन प्रश्न सोडवायचे आहेत , तसेच सर्व प्रवर्गातील अपंगाना मुख्य प्रवाहात आणुन जिल्ह्यातील , तालुका वाईज , शहरातील वार्ड वाईज प्रहारच्या माध्यमातुन प्रहारची ध्येय धोरणे प्रत्येक अपंगापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे व प्रहार अपंग संघटनेच्या वाढीसाठी राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात , तालुक्यात व शहरात शाखा तयार कराव्यात व राज्यातील अपंगाना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा

यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य परभणी हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ परळकर सर व प्रहार शिक्षक संघटनेचे परभणी जिल्हा प्रमुख शाहूराव गवारे प्रहार अपंग संघटनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश दहिवाल नवनियुक्त पाथरी तालुका अध्यक्ष दीपक भाऊ कुडे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या कार्यकर्ते उपस्थित होते . व दिपक खुडे यांना पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Share now