ताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन :राजेश भैय्या टोपे

पक्ष वाढीसाठी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी उभा आहे :- राजेश भैय्या टोपे

अजहर शेख हादगावकर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्यकर्ता मेळावा आणि पद नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद पूर्व विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव जाधव आणि कार्याध्यक्ष जावेद नवाज खान यांच्यातर्फे करण्यात आले होते.
जय भवानी नगर येथील वडजे मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादी औरंगाबाद संपर्क प्रमुख राजेश भैय्या टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात तसेच प्रमुख उपस्थितींचे फुलांच्या वर्षाव करून या ठिकाणी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती विशेष म्हणजे कार्यकर्ता मेळावा तीन तासाच्या आसपास चाललेला या कार्यक्रमास संबोधीत करताना म्हणाले की मी पक्ष वाढीसाठी संपर्कप्रमुख या नात्याने कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी उभा असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. शहरातील विविध विकास कामावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारमध्ये राष्ट्रवादी असताना आपण केलेले कामे जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम हे

कार्यकर्त्यांचा असून नागरी समस्या साठी सदैव आपण लढत राहावं आणि ज्या ठिकाणी माझी गरज असेल त्या ठिकाणी मी हजर राहील असेही ते म्हणाले. कार्यक्रमा दरम्यान शिवसेना, भाजप आणि काँग्रेस पक्षामधून अशोक गायकवाड, दिलीप हरणे, वसंत महाराज, गणेश सोनार, बाळासाहेब सोनवणे, अमोल जाधव, माणिकराव शिंदे, सुभाष जगताप या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, विद्युत आणि सिडको

हडकोतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेवू त्याचबरोबर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये वाढते ते शाखेचं आयोजन करण्याच्या सूचना राजेश टोपे यांनी केल्या शहरात प्रत्येक पाच – पाच वार्डाचे मेळावे आयोजित करून सर्व सेलचे सर्व वार्डामध्ये पदाधिकारी नेमणूक झालीच पाहिजे असे आदेशही त्यांनी दिले. अतिशय नियोजनबद्ध आणि सुंदर कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठलराव जाधव आणि जावेद खान यांनी केल्याचे टोपे यांनी कौतुकही या ठिकाणी केले.

पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करत आहे: ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विधानसभेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यास संबोधीत करताना मी सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून पक्ष वाढीसाठी काम करत असल्याचे ते म्हणाले शहराध्यक्ष झाल्यापासून कार्यक्रमाचा झपाटा शहरात लावला हजारो लोकांचा प्रवेश राष्ट्रवादी पक्षामध्ये करून घेतला पक्षाने वारंवार दिलेल्या सूचनेनुसार धरने, आंदोलने, उपोषण केले महापालिकेच्या अनुषंगाने बहुतांशी वार्डाची तयारी पूर्ण झाली असून जास्तीत जास्त नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाचे निवडून आणण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू असून घर-घर चलो अभियानाची सुरुवात पक्षवाढीसाठी करण्यात आली असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी यावेळी सांगितले

पक्षवाढीसाठी आम्हाला मोठ्या नेतृत्वाची गरज राजेश भैय्या टोपे यांनी वेळ द्यावा:- जावेद नवाज खान पक्षवाढीसाठी आम्हाला स्थानिक नेत्याबरोबरच मोठ्या नेतृत्वाची गरज आहे. औरंगाबाद शहरासाठी राजेश भैय्या टोपे सर्व परिचीत नेते आहेत. टोपे यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. पवार साहेबांचे विचार घरा-घरात पोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी टोपे साहेबांनी वेळ द्यावा अशी मागणी आपले मनोगत व्यक्त करताना औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद खान यांनी केली. आम्हाला पद दिल्यापासून अहो-रात्र पक्ष वाढीसाठी काम करत आहोत वार्डा – वार्डात जावून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वार्ड अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या नागरी समस्यासाठी जन आंदोलन केले पक्षाच्या प्रत्येक कामात हिरीरीने सहभाग नोंदवून काम करत असून पूर्व विधान सभेमध्ये पाच कार्यकर्ता मेळावे आणखी करणार असल्याचे जावेद नवाज खान यांनी यावेळी सांगितले.

पूर्व विधानसभेच्या कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले:- विठ्ठल जाधव औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले शहरातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेतल्या वार्डामध्ये जावून मेळाव्याचे निमंत्रण दिले. कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेशासाठी प्रोत्साहीत केले.पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या पूर्व विधानसभा मतदार संघातील संपूर्ण वार्ड बांधणी केली कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडी-अडचणी समजून घेवून सोडण्याचा नेहमीच प्रयत्न करून पक्षाची ताकद वाढवण्याचा नेहमीच प्रयत्न केला शहरात पिण्याच्या खूप मोठा प्रश्न आहे म्हणूनच याकरिता पाण्याचा सर्वात मोठा हंडा मोर्चा काढून त्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले महापालिकेत औरंगाबाद पूर्व विधानसभेतून चांगला प्रतिसाद नक्कीच मिळेल असे औरंगाबाद पूर्व विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव जाधव हे म्हणाले.

यांना देण्यात आली पदे माजी नगरसेवक राजाराम मोरे, अशोक गायकवाड, प्रशांत जगताप, धर्मराज गणगे, रवी तांगडे, सुनील देवकर राहुल मगर, कलीम शेख, मोहम्मद अजहर, कैसर शेख, अरवींद उगले, रजा अन्सारी, राहुल कावरे, सुनील घुले, तुषार शिंदे, गणेश सोनार, आफताब खान, आर बी चव्हाण, समीर खान, सलमान शेख, रफीक शेख, फिरोज खान, रवींद्र बोचरे, अंकुश जाधव,नशीर पटेल, शेख हाशम, फय्याज खान, विखार पटेल, सय्यद युसुफ, आलीयार खान, शेख इलीयास, शेख नय्यर,शेख जमीर, परवेज शेख, सय्यद कदिर, अनिल दामले, सरफराज शेख, शाहरुख शेख, शेख इरफान, शेख फारुख, शकील खान, शेख फैय्याज इत्यादींना पदे वाटप करण्यात आली.

पूर्व विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष इलीयास किरमाणी, प्रदेश सचिव प्रा. माणिकराव शिंदे, डॉ. बाळासाहेब पवार, युवक शहराध्यक्ष डॉक्टर मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष कय्युम अहेमद आदींनी मार्गदर्शन केले. सर्वांनी शहरातील विविध नागरी समस्या कडे संपर्क प्रमुखाचे लक्ष वेधले पाणीपट्टीसाठी केलेले आंदोलन आणि मिळवलेल्या यशाबद्दल माणिकराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. पक्ष वाढीसाठी सर्वांनी सोबत मिळून काम करण्याची गरज असल्याचे इलीयास किरमाणी म्हणाले याप्रसंगी मोहम्मद हबीब मुन्नाभाई शहर जिल्हा उपाध्यक्ष, आयुब खान ,मुक्तार खान, इब्राहिम पठाण, शेख आसिफ, मोतीलाल जगताप यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र तांगडे पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मोहम्मद हबीब मुन्नाभाई यांनी केले.

Share now