ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

रेणाखळी जि.प.शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

पाथरी प्रतिनिधी.पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथे आज दि.१५ सप्टेंबर रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा मुक्तीसंग्राम विषयी मुलांमध्ये जागृती निर्माण व्हावी तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडुन शाळेत स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

रेणाखळी येथील रामबाण मेडीकलचे संचालक उध्दव इंगळे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ सिराज शेख यांच्या सौजन्याने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री तांबुळी सर, पवार सर, हुलवणे सर, बाबळे सर, भामरे सर, एडके सर, व व्हि.टी. गव्हाणे ,बि .जी. गव्हाणे सर व सर्व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.

Share now