रेणाखळी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील मुलींचे एन एम एम एस परीक्षेत यश
पाथरी प्रतिनिधी. पाथरी तालुक्यातील रेनाखळी येथील जिल्हा परिषद प्रशाला येथील चार मुलीने एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केले१ कल्पना रामेश्वर इंगळे २) राधा राम सोनुळे ३) कविता नागोराव तालडे ४) राधा तुकाराम इंगळे या चार मुलींनी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा एका छोटेखानी

समारंभात सत्कार करण्यात आला .यावेळी ग्रामपंचायत सरपंच राहुल ब्रम्हराक्षे , उपसरपंच शेख अनिस ,शेख अलीम ,मुंजाभाऊ हरकळ, तुकाराम हरकळ गणेश घोगरे, उत्तम ब्रह्मराक्षे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तीरामजी हरकळ , शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उध्दव इंगळे , मुख्याध्यापक तांबोळी सर

उपस्थित होते .या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पवार सर ,बीजी गव्हाणे सर ,संतोष बाबळे सर, भामरे सर, सलीम सर हुलवणेसर राऊत सर ,यांचाही गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यशस्वी विद्यार्थ्यांना सरपंच राहूल ब्रह्मराक्षे यांच्याद्वारे धनादेशाचे वाटप करण्यात आले . मुख्याध्यापक तांबोळी सर सरपंच राहुल ब्रह्मराक्षे, उद्धव इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आभार प्रदर्शन श्री पवार सर यांनी केले.