आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

रेणुका शुगर्सची गाळप क्षमता वाढवण्याच्या मागणी साठी आज पाथरीत रास्तारोको अंदोलन

रेणुका शुगर्सची गाळप क्षमता वाढवण्याच्या मागणी

शेख अजहर हादगावकर पाथरी येथे रेणुका शुगर्स शिवाय गोदावरी नदी वरील तीन ही साखर कारखाण्याची गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार मेट्रीक टन करा आणि अन्य मागण्या साठी पाथरीतील सेलू कॉर्नर येथे ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले

उच्च पातळी बंधारे पुर्ण क्षमतेने भरत असल्याने पाथरी तालुक्यातील शेतकरी ऊसाच्या पिका कडे वळला . आहे उसाचे पिक जोमदार येऊन ही त्याचे गाळप होईल की नाही ही चिंता शेतक – यांना सतावत आहे . मागिल तीन वर्षा पासुन तालुक्यात जोरदार पर्जन्य वृष्टी झाल्याने सर्वत्र पाण्याची उपलब्धता आहे .

त्यातच जायकवाडी धरन सतत । तीन वर्षा पासून शंभर टक्के भरत आहे देवनांद्रा शिवारात असलेल्या रेणूका शुगर्स साखर कारखाण्याची गाळप क्षमता वाढल्यास तालुक्यातील प्रत्येक शेतक – याच्या उसाचे निश्चित गाळप होईल ही भावना ऊस उत्पादकां मध्ये दृढ झाली असून मागिल काही दिवसा पासून ऊस उत्पादक शेतकरी किसान सभेच्या पुढाकारातून लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसत रस्त्यावर उतरत आहेत .

किसान सभेच्या नेतृत्वात ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे रास्ता रोको करण्यात आले यात शंभर टक्के ऊस गाळपाची हमी द्या , रेणुका शुगर्सची गाळप क्षमता प्रतीदिन दहा हजार मेट्रीक टन करा , सर्व कारखाण्यां कडील एफआरपी अदा करा , एफआरपी दरात वाढ करा ,

वजन काट्यातील घोळ दूर करा , सर्व कारखान्यांच्या उस उत्पादनातील नफ्याचा रेव्हेन्यू शेअरिंग फार्मुल्यानुसार अधिक लाभ उस उत्पादकांना द्या , थकीत पिक विमा अदा करा , जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यांची दुरुस्ती करा या प्रमुख मागण्यां साठी हा रास्ता रोको अंदोलन करण्यात आले

Share now