ताज्या घडामोडी

रोहिलागड युनियन बँकेकडुन प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेतुन दोन लाखाचा विमा प्रदान.


रोहिलागड ता.०२ (बातमीदार)रोहिलागड येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रोहिलागड यांच्या कडुन अनेक खातेदारांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री जीवन विमा पाॅलीसी काढण्यात आल्या होत्या. यातील लाभार्थी कल्याण वखरे रा.देशगव्हाण यांची देखील पाॅलीसी काढली होती. मात्र त्यांचे निधन झाल्यानंतर बँकेने त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देऊन कागदपत्रे घेवुन दावा दाखल

केला व निकाली काढुन वारस मुलगा महेश कल्याण वखरे यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी बँक शाखा व्यवस्थापक सचिन गोंडेपाटील यांनी बँकेतील सर्व खातेदारांनी हा विमा काढावा जेणेकरून कुटुंबीयांचे सुरक्षित राहील असे सांगितले, तसेच अटल पेन्शन योजना, सुकन्या समृध्दी

योजना, या योजनेचा देखील लाभ ग्राहकांनी घ्यावा असे सांगितले. यावेळी बँकेचे अधिकारी निलेश आबगड,सचिन डोंगरे,केतन वानखेडे, रोखपाल साकसकर,संतोष पैठणे तसेच बँकमित्र उपस्थित होते.

Share now