ताज्या घडामोडी

रोहिलागड येथे शिष्यवृती परिक्षा सुरळीत व शांततेत संपन्न

अंबड/प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूणे यांच्या मार्फत ता.१२ गुरुवार रोजी आयोजित पुर्व माध्यमिक व पूर्व उच्च प्राथमिक स्तरावरील गुणवताधारक विद्यार्थांसाठीची शिष्यवृती परिक्षा रोहिलागड येथील जांबुवंत विद्यालयात सुरळीत संपन्न झाली. या परीक्षेसाठी एकुण विद्यार्थी १०४ पैकी ९४ विद्यार्थी उपस्थित होते.

या परीक्षेच्या वेळेस कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले .यावेळी परीक्षा हॉलमध्ये जाण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करण्यात आली.मास्क लावूनच हॉलमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. परिक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यास केंद्र प्रमुख श्रीमंत गंगावणे व केंद्रसंचालक योगेश झांबरे यांनी परिश्रम घेतले.

Share now