ताज्या घडामोडीमनोरंजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यपदी भागवत देवसरकर


संपादक अहमद अन्सारी. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यपदी नांदेड येथील भारतीय जनता पक्ष, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांची निवड राज्य सरकारने केली आहे.


पंधरा वर्षापासून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या माध्यमातून जिल्हाभरात कार्यकर्त्यांचे जाळ निर्माण करून शेतकर्‍याच्या हिताचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून भागवत देवसरकर यांची ओळख आहे.

मागील बारा वर्षापासून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या तालुकाध्यक्ष ते महाराष्ट्राच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचा विस्तार महाराष्ट्र भर करण्यात मोठा वाटा आहे. शेतकर्‍यांसाठी शेतकरी मेळावे त्यांच्या

प्रश्नाविषयी शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठून विशेष प्रयत्न केले आहेत,शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयी केलेल्या कामाच्या जोरावरच भागवत देवसरकर यांची परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या कार्यकारी परिषद सदस्य यापदावर निवड करण्यात आली आहे.


भागवत देवसरकर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंतभाऊ पाटील, माजी मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील, आ. राम पाटील रातोळीकर,

आ. बालाजी कल्याणकर, आ. आमदार राजेश पवार, माजी आ. रामराव वडकुते, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, परभणीचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजीराव पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले.

चौकट
मला एकनिष्ठचे फळ मिळाले – भागवत देवसरकर
मागील 15 वर्षांपासून मी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद व महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विखे परिवार यांच्याशी एकनिष्ठ असल्यामुळेच व मी आजवर शेतकऱ्यासाठी केलेल्या कामाचा जोरावरच माझ्या कार्याची पावती म्हणूनच परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यपदी निवड झाली आहे

Share now