ताज्या घडामोडी

वाघाळा येथे. जिवाची बाजी लाऊन सरपंचांनी वाचवले विहिरीत पडलेल्या महिलेचे प्राण

वाघाळा गावचे आदर्श युवासरपंच बंटी पाटील घुंबरे यांचं धाडस

संपादक अहमद अन्सारी पाथरी:- तालुक्यातील वाघाळा गावातील मंगळवार १० ऑगष्ट रोजी सायंकाळी आठ साडे आठ वाजता घडलेल्या थरारा विषयी थोडक्यात माहिती अशी की, प्रत्येक नागरिकानां अबालवृध्द सर्वानांच आपल्या या तरूण सरपंचाचा म्हणजेच बंटी पाटील घुंबरे यांचा अभिमान वाटत आहे आणि त्याला कारण ही तसेच घडले आहे.

बंटी पाटील यांनी सरपंच या नात्याने गावाचा कारभार घेऊन फक्त सहा महिने झाले आहेत.
कोरोनाच्या काळात त्यांनी गावाला कुटूंबा प्रमाणे सांभाळले, गावातील भांडणे- तंटे गावातच मिटत आहेत. गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात हा माणूस सगळ्यांत आगोदर हजर आहे. कशाचीच अपेक्षा नाही आणि भ्रष्टाचाराची वृती नाही (आणि गरजही नाही) अशा सगळ्या गुणां मुळे ते सर्वांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहेत. आणि त्यातच१० ऑगष्ट मंगळवार रोजीच्या घटनेने सगळ्या गावाला आपल्या या सरपंचाचा अभिमान वाटत आहे.

रात्री आठ ते साडे आठची वेळ, गावातील एक महिला गावा पासुन ३ कि.मी अंतरावर असलेल्या शेतातील एका विहिरीत आढळून आली, सरपंचाला एकाचा फोन आला.सरपंच बंटी पाटील नेमकेच जेवायला बसले होते, समोरच ताट बाजूला सारून सरपंच लागलीच बाहेर पडले.
दोन-तीन तरूणांना सोबत घेऊन ते घटनास्थळी पोहचले, विहिरीत बॅटऱ्या मारल्या विस फुट खाली पाण्यावर महिलेची बाॅडी तरंगलेली दिसली. सोबतची तरूण मंडळी महिलेला पाण्यात पडुन कितीवेळ झाला असेल याचा आंदाज लावत होते. पण सरपंच बंटी पाटील यांना निरक्षाणात महिलेची हालचाल दिसली त्यांनी सोबतच्यांना महिला जिवंत असल्याची माहिती दिली.

सोबतचे सगळेच एका आवाजात म्हणाले मला पोहता येत नाही बाबा..! कारण परिस्थितीती भयानक होती रात्रीची वेळ, भयानक अंधार घटनास्थळी फक्त चौघेजन, अशा अवस्थेत शंभर किलो पेक्षा जास्त वजन असलेल्या बंटी पाटलांनी क्षणाचाही विचार नकरत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली, संबंधित महिलेला विहिरीच्या कडेला आनले जिथे मोटरीसाठी दोर सोडलेला असतो यांच्या स्पर्शाने, आवाजाने
महिलेच्या शरीराची हालचाल वाढली ती जिवंत होती.

सरपंचानी स्वतःच्या खाद्यावर घेऊन महिलेला वर काढण्याचा प्रयत्न सुरू केला स्वतःचे वजन आणि शुध्दीवर नसलेल्या या महिलेचे वजन घेऊन बंटी पाटील विहिरीच्या बाहेर निघण्याचे शर्तीचे प्रयत्न करू लागले एवढ्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आणि स्वभावाने धाडसी असलेल्या ऋषीकेश घुंबरे यांनी सरपंचांची परेशानी पाहुन विहिरीत उडी घेतली. आणि सरपंचाना सहकार्य केले.एकाला दोघे झाले. विहिरीच्या वर असलेल्या दोघांनी आपल्या आपल्या पध्दतीने सहकार्य करून महिलेला संपूर्ण ताकदीने जिवंतपणे वर काढले.
तो पर्यंत गावातील तरूण व गावकरी घटनास्थळी पोहचले.लगबगीने महिलेला गावातील अॅब्युलन्स मध्ये पाथरीला आणि नंतर परभणीला नेण्यात आले.

आता त्या महिलेची प्रकृतीस्थीर आहे. संबंधित महिलेला दोन मुली एक मुलगा असे तिन अपत्ये आहेत.मागच्या दोन महिण्यापुर्वी त्यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले, तेव्हा देखील सरपंचानीं पुढाकार घेऊन या कुटूंबाला स्वतःसह लोकवर्गणीतून लाखभर रुपयांची मदत केली आणि आज त्या महिलेचे प्राण वाचवूण तिच्या लहान मुलांना त्यांची आई मिळून दिली.
बंटी पाटलांच्या या धाडसाच सगळं गावं कौतुक करत आहे.आपल्या गावातील माणसांना जिवापलीकड जपणारा सरपंच आम्हाला मिळाला याचा अभिमान आता सर्वानांच वाटत आहे.

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक अहमद अन्सारी. मो.7218275486

Share now