ताज्या घडामोडीमनोरंजन

वाघाळा येथे पाचशे वृक्षांची लागवड लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने

संपादक अहमद अन्सारी. पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे सहकार कर्यालय सेलू,स्व नितिन महाविद्यालय आयक्यूएसी विभाग,जन्मभूमी फाऊंडेशन पाथरी यांच्या वतीने आणि ग्रामपंचायत कार्यालय वाघाळा,जि प मा शाळा वाघाळा यांच्या सहकार्याने संयुक्त उपक्रम राबवत बुधवारी जि प मा शाळा वाघाळा शाळे मध्ये विविध वृक्षांची रोपे शाळा परीसरात लावण्यास प्रायरंभ केला.या वेळी या कार्यक्रमा साठी सेलूचे सहकार अधिकारी माधव यादव,सचिन लोणीकर,सरपंच बंटी पाटील,स्व नितिन महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख सौ प्रा डॉ शितल गायकवाड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ साहेब राठोड,माजी विद्यार्थिनी किरण भिसे,जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे, संपतराव घुंबरे, सामाजिक युवा कार्यकर्ते हनुमान घुंबरे,क्रिडा

अधिकारी मुजिब शेख,सचिन वाघ यांच्या सह शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती. गेली काही वर्षा पासुन जन्मभूमी फाऊंडेशन स्व नितिन महाविद्यालय आणि विविध सामाजिक संस्था कार्यालये व्यक्ती,आणि वाघाळा ग्रामस्थांच्या सहकार्याने गाव पाणीदार आणि हिरवेगार करण्या साठी मागिल काही वर्षा पासुन विविध उपक्रम राबवत आहे.त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सेलूचे सहकार कार्यालय,स्व नितिन महाविद्यालय,पाथरी यांच्या सहकार्याने आणि वाघाळा ग्रामस्थांच्या सहभागातून पाचशे वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला वरील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ केला.

कोविड-१९ चे नियम पाळत औपचारीक पणे मान्यवरांच्या सत्कारा नंतर सेलूचे सहकार अधिकारी माधव यादव,प्रा डॉ शितल गायकवाड यांनी वृक्षलागवड आणि संगोपण काळाची गरज असल्याचे विषद करून प्रत्येका घरच्या मुलांनी दर वर्षी किमान तीस झाडांची लागवड करून संगोपण करण्याचे आवाहन केले. लागवड केलेले झाड संगोपणा साठी दत्तक दिले जाते. दर वर्षी शेतक-यांनी आपल्या शेतात बांधावर विविध फळझाडांची लागवड करून शाश्वत उत्पादन घेत पर्यावरण संतुलना साठी कर्तव्य पार पाडावे असे आवाहन करण्यात येते. याला वाघाळा ग्रामस्थ चांगला प्रतिसाद देत असून गाव आता हिरवाईने नटून जात आहे.या वेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रा डॉ साहेब राठोड यांनी मानले.या कार्यक्रमा साठी गवारे सर जाधव सर,चव्हान मॅडम,सुमित लांडे यांनी परीश्रम घेतले

Share now