आम मुद्देताज्या घडामोडी

वाघाळा येथे मृत्यू झालेले आदिवासी तरुणाच्या कुटुंबाला पाथरी तहसीलदार श्रीकांत निळे यांची भेट

शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात येईल तहसीलदार यांचे आश्वासन

पाथरी प्रतिनिधी अन्वर खान आज दिनांक २९-०७-२०२१ रोजी पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वेळेवर उपचार न झाल्यामुळे मृत्यू झालेले आदिवासी तरुणाच्या कुटुंबाला तहसीलदार पाथरी यांनी भेट दिली आणि बैलगाडी वरून आदिवासी वस्तीच्या रस्त्याची

पाहणी केली व पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम सुरू करू व मृत्यू झालेल्या आदिवासी तरुणाच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे टाकू असे आश्वासन दिले आहे. आदिवासी वस्तीच्या लोकांना भेटदेण्या वेळेस वाघाळ्याचे सरपंच भागवत घुंबरे उर्फ बंटी काका आणि ग्रामपंचायत सदस्य बाळू पवार व शिवाजी पवार, बापू पवार,भागोजी पवार उपस्थित होते.

Share now