ताज्या घडामोडीमनोरंजन

शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटी आजादीच्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त पाथरी शहरात भव्य रॅलीचे आयोजन

पाथरी प्रतिनिधी. शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटी पाथरी संचलित श्री शरदचंद्रजी उर्दू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय एकता नगर पाथरी अब्दुल खालेख अन्सारी उर्दू हायस्कूल एकता नगर पाथरी अब्दुल खालेख अन्सारी उर्दू प्राथमिक शाळा एकता नगर पाथरी बीबी फातिमा उर्दू प्राथमिक शाळा मुर्तुजा कॉलनी पाथरी अबू अयुब अन्सारी उर्दू प्राथमिक शाळा गुलशन नगर

मौजे देवनांद्रा शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा जवाहर नगर मौजे बांदरवाडा संस्थेच्या सर्व शाळेमध्ये आजादी च्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त पाथरी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा याप्रकारे विद्यार्थ्याने अनेक घोषणा देण्यात आले

सदरील भव्य रॅली बीबी फातिमा उर्दू प्राथमिक शाळा पासून ते चौक बाजार मेन रोड पाथरी नगरपालिका समोरुन राष्ट्रवादी भवन समोरून अब्दुल खालेख अन्सारी उर्दू हायस्कूल पाथरी इथ पर्यंत भव्य रॅली

काढण्यात आले या रॅलीमध्ये सर्व शाळेचे विद्यार्थी कमीत कमी सोळाशे सतराशे विद्यार्थी उपस्थित होते या रॅलीचे आयोजक शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटी पाथरी चे अध्यक्ष अब्दुल हबीब अन्सारी यांनी केले होते यावेळी या भव्य रॅलीला हिरवे झेंडे पाथरीचे गट शिक्षण अधिकारी मुकेश राठोड साहेब यांनी हिरवी झेंडी दाखवली यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे सचिव अब्दुल रब अन्सारी, मोहम्मद निसार अन्सारी,

मोहम्मद कलीम अन्सारी, माजी नगराध्यक्ष नगर परिषद पाथरी रफिक अन्सारी हातिम भैया अन्सारी या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मुख्तदीर अन्सारी ,अब्दुल वाजेद अन्सारी, मोहम्मद मारुफ शेख रियाज अन्सारी फरहाणा मॅडम व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले व मुख्तदीर अन्सारी यांनी सर्व विद्यार्थी सर्व प्रमुख पाहुणे यांचे आभार व्यक्त करून सदरील रॅली मध्ये आलेल्या सर्व मान्यवराचे आभार व्यक्त करून सदरील रॅली संपन्न झाली असे जाहिर करण्यात आले

Share now