मनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

पाथरी तालुका जिल्हा परभणी येथे दिनांक २६ नोव्हेंबर शनिवार रोजी शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व रंगीत तालीम कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिलराव नखाते, मुख्य प्रशिक्षक योगेश्वर आव्हाळे आपत्ती व्यवस्थापन यशोदा पुणे तथा जिल्हाधिकारी कार्यालय परभणी ,

सहाय्यक प्रशिक्षक योगीराज आव्हाळे वैभव कचवे , मंगेश हिरे ग्रामीण रुग्णालय पाथरी येथील डॉक्टर ईकर साहेब सुरक्षा विभाग होमगार्डचे सी ओ विजयकुमार सोळंके अग्निशमन दल पाथरी चे प्रमुख खुरम खान खदीर खान, प्राचार्य डहाळे के एन मुख्याध्यापक यादव एन ई आदी उपस्थित होते संविधान दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉक्टर

बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान संहिता यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डहाळे के एन यांनी केले उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन शी निगडित इतर घटक यांना योगेश्वर आव्हाळे यांनी मार्गदर्शन केले यासोबतच आपत्ती व्यवस्थापनामध्ये वापरावयाच्या कृती आणि खबरदारी यांचे प्रात्यक्षिक व रंगीत तालीम घेण्यात आली या

प्रशिक्षणासाठी पाथरी तहसील कार्यालय, पाथरी नगरपालिका कार्यालय ग्रामीण रुग्णालय पाथरी तथा अग्निशमन दल सुरक्षा व्यवस्था , यांनी सहकार्य केले जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नेमण्यात आलेल्या या प्रशिक्षक संघाने भूकंप, नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित आपत्ती यामध्ये जीविताची हानी होणार नाही तसेच आपत्ती ओढवल्यानंतर त्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आवश्यक बाबी विद्यार्थ्यांना व उपस्थिताना समजावून दिल्या व प्रात्यक्षिके करून घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन चव्हाण तर आभार प्रदर्शन प्रा. बालासाहेब गायकवाड यांनी केले.

Share now