आम मुद्देताज्या घडामोडी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेबांची खा.संजय जाधव साहेबांसोबत भेट घेतली

शेख अजहर हादगावकर परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे म्हणून खा. संजय जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली परभणीकरांचे आंदोलन सुरू आहे. शासनाने परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास या महाविद्यालयासाठी जागा लागणार आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची ५० एक्कर जमीन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देऊ केली आहे. तसेच गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव शिवारातील मराठवाडा विकास महामंडळाची १०० एक्कर जागाही उपलब्ध

आहे. या दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणची जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यात यावी म्हणून खा. संजय जाधव यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची आज मुंबईत भेट घेतली. या भेटीत वरील दोन्ही जागेसंदर्भात उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली. परभणीच्या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोणतीही जागा उपलब्ध करून द्या, असा आग्रह खा. जाधव यांनी ना. देसाई यांच्याकडे धरला.त्यावर ना. देसाई यांनी सांगितले की, गंगाखेड रोडवरील मराठवाडा विकास महामंडळाची ३ गटात १०० एक्कर जमीन आहे. त्यापैकी दोन

गटाच्या जमिनीवर कर्ज घेतलेले आहे. हा कर्ज बोजा कमी करून बेबाकी व ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यास ही जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देता येईल. ही पूर्ण प्रक्रिया पार पाडून जमीन उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन ना. देसाई यांनी खा. जाधव यांना यावेळी दिले.उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा आता जवळपास सुटला असून परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.यावेळी माझ्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम उपस्थित होते.

Share now