आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

शासना कळुन 5 % निधी अपंगांना देण्यात यावे. एका वर्षा पासुन निधी थकीत

पाथरी येथे. आज दिनांक. 31. अक्टोबरला परभणी जिल्ह्यातील दिव्यांगाना शासनाच्या विविध योजना आहेत परंतु या योजनांची अंमलबजावणी शासन स्तरावर होत नाही. अंपगांना अंत्योदय योजने अंतर्गत राशन कार्ड उपलब्ध करुन देण्यात यावे दिव्यांगाना नगर परिषद व ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणारा 5% टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.

ग्रामपंचायत कडून दिल्या जाणारा 5% निधी अदयाप पर्यंत वाटप करण्यात आलेला नाही तो वाटप करण्यात यावा. तसेच नगर पालिकेच्या घरपट्टी व नळ पट्टी मध्ये सुट देण्यात यावी. तसेच नगर पालिका हद्दीतील अंपग व्यक्तींना 200 चौ.मी. प्रमाणे गाळे देण्यात यावे. अपंगाना विनाअट घरकुल उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच संजय गांधी, श्रावणबाळ, परितक्त्या यांना योजनेचे पैसे 4 महिण्यापासुन अदयापही त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाही

ते जमा करुन लाभ मिळून देण्यात यावा. UID कार्ड व अपंगत्वाचे प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात यावे. समाज कल्याण मार्फत बिज भांडवल अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे व योजनेपासुन अदयापही अपंग व्यक्ती वंचित आहेत.पाथरी उपजिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आले व अपंग व्यक्तींना सोई सुविधा व योजनांचा लाभ मिळून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे

Share now