श्री शरदचंद्रजी पवार ऊर्दू विज्ञान कनिष्ठ महाविद्याल चा 93 % निकाल
93 % निकाल 12 वी परीक्षेत घवघवीत विद्यार्थ्यांचे यश
पाथरी प्रतिनिधी. 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबाद च्या वतीने मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इ.12 वी बोर्ड परीक्षेत पाथरी येथील शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटी पाथरी संचलित श्री शरदचंद्रजी पवार ऊर्दू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल 93 % लागला आहे . यातून यशाची परंपरा कायम राखली आहे.
पठान शाहिस्ता युनूस या विद्यार्थिनीने 56% गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे व शेख शबाना रब्बानी 53% घेऊन द्वितीय क्रमांक घेतला आहे तृतीय क्रमांक निदाब बेगम मोहम्मद रफीक 52 टक्के गुण प्राप्त केले आहेत .व शाळेचे प्रथम श्रेणीत 1 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 7 उत्तीर्ण झाले. 28 विद्यार्थी परिक्षेत बसले यातुन 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष अब्दुल हबीब अन्सारी संस्थेचे सचिव अब्दुल रब अन्सारी सभासद निसार अन्सारी, लतीफ अन्सारी ,मिर्झा खुर्शीद बेग, हातेम अन्सारी ,खाजा अन्सारी ,खैसर शेख, कलीम अन्सारी,मुख्याध्यापक अब्दुल मुख्तदीर अन्सारी ,शिक्षक वृंद काझी मुबशीर ,अहेमद अली , सिद्दिकी बुशरा अन्सारी शाहीन,अन्सारी आयशा,मोसिन अन्सारी, मुशीर पठाण यादीनी सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .