ताज्या घडामोडीमनोरंजन

श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिन साजरा

संपादक अहमद अन्सारी. पाथरी परभणी. परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथिल श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात आज दिं.५ सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली .


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सहशिक्षक यु .व्ही.खवल तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांची उपस्थिती होती.


या वेळी यावेळी मुख्याध्यापक पाटोदकर यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर यु .व्ही.खवल यांनी माणसाने कसे वागावे या बद्दल आपले विचार मांडले . काही माणसं जिवंत पणी पण त्रास देतात व मेल्या नंतर ही त्रास देतात असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सहशिक्षक श्री सी.एन.खवल यांनी केले.


या वेळी विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आबासाहेब गाडेकर, पाराजी रोकडे, विद्यानंद सातपुते, भास्कर कुलकर्णी , पांडुरंग डवरे,शंकर खरात व गणेश वखरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी एकनाथ टाके व मुकूंद भुंबर यांनी शाळेतील सर्व कर्मचारी वर्गाचा पुष्पहार घालून सत्कार केला.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share now