श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ति संग्राम दिन साजरा
संपादक अहमद अन्सारी. माजलगाव. मराठवाडा मुक्ति संग्राम दिन येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शालेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यानंतर सांघिक पद्य व सरदार वल्लभ भाई पटेल व स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय समितीचे कार्यवाह विष्णुपंत कुलकर्णी तर प्रमुख अतिथि विशाल ठोसर हे होते तर व्यासपीठावर श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय समितीचे सदस्य मधुर रुद्रवार, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उप मुख्याध्यापक विजेंद्र चौधरी सर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश जोशी सर इत्यादी उपस्थित होते.

यानंतर प्रमुख अतिथि विशाल ठोसर यांनी मराठवाडा मुक्ति संग्रामाचा इतिहास, क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक विजेंद्र चौधरी सर यांनी केले तर आभार व सुत्रसंचालन श्रीमती रेश्मा आळणे यांनी केले कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली. शांती मंत्र विजयकुमार सोन्नर यांनी सांगीतला. यावेळी विद्यार्थी, मान्यवर संस्था पदाधिकारी, सभासद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.