आम मुद्देताज्या घडामोडी

संत जनाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सोईसुविधा पुरविणे

आम आदमी पार्टीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

गंगाखेड -प्रतिनिधी महाराष्ट्रभर ख्याती असलेल्या संत जनाबाई जन्मस्थळच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सोयी सुविधा पुरविण्यात गंगाखेड नगरपालिका असमर्थ ठरली ठरली आहे. या सोयी सुविधा पुरविण्यासाठी आपण नगरपालिकेला आदेशित करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे बुधवारी (27 जुलै) करण्यात आली. गंगाखेड हे संत जनाबाईचे

जन्मस्थळ आहे .गोदाकाठावर असलेल्या संत जनाबाई जन्मस्थळाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक भक्त, वारकरी येत असतात. रेल्वे, बस णे आलेल्या भक्तांना दर्शनासाठी जाण्यासाठी दिलकस चौक या मार्गाने जनाबाई मंदिराकडे जावे लागते. पण दिलकस चौकापासून जनाबाई मंदिरापर्यंत असलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात सासलेच्या साचलेल्या घाण पाण्याचा भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे.

जागोजागी पाणी साचले असून यामुळे वाहनाच्या ये-जा करण्याने हे पाणी भक्ताच्या अंगावर उडत आहे. सकाळी सकाळी प्रसन्न वातावरणात दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना याचा खूपच त्रास होत आहे. मोठा मारुती मंदिराच्या आसपास दुर्गंधी पसरली आहे. या भागात डासाचे प्रमाण पाहता धूर फवारणी करणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या अशा या रस्त्यावर नगरपालिकेने पथदिवे ही बसवलेले नाहीत. एकूणच चिंतामणी मंदिर, नरसिंह मंदिर, बालाजी मंदिर ,शनी मंदिर आधी महत्त्वाच्या मंदिराच्या

दर्शनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर नगरपालिकेने भक्तासाठी सोयी सुविधा पुरवने आवश्यक आहे .पण यासाठी नगरपालिका आज पर्यंत तरी असमर्थ ठरली आहे. या सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी आपण नगरपालिका प्रशासनाला आदेशित करावे अशी विनंती आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे यांनी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपालिका, उपअभियंता महावितरण आदींना देण्यात आल्या आहेत.

Share now