मनोरंजनराजकिय घडामोडी

संस्कार महाविद्यालय येथे निर्भया पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पाथरी प्रतिनिधी. आज दि. 19 नोव्हेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त पाथरी शहरातील संस्कार महाविद्यालय येथे निर्भया पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सौ.किर्ती धिगळे यानी मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठी/ काठी चे प्रशिक्षण दिले तर महिला

पोलीस जमादार संगीता वाघमारे यांनी कराटे चे प्रात्यक्षिके दाखविली तर डॉ मंजुषा चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर महिला व बालविकास अधिकारी मंगल गायकवाड यांनी मुलींशी संवाद साधला कार्यक्रमात शहरातील अश्विनी चौधरी, अश्विनी जोशी ,

उन्मेशा कुलकर्णी, डॉ.शिवप्रिया उगले यांनी विद्यार्थ्यांनशी संवाद साधला तर कार्यक्रमास विद्यालयातील प्राध्यापक एक.बी.वाघमारे,ए.आर.जोशी,एस.डी चव्हाण,डी.ए.यादव,आर.यु. शेजुळ,आर बी.नाईक असे कार्यक्रमास उपस्थित होते.

Share now