राजकिय घडामोडी

सईद खान ऊर्फ गब्बर भाई यांच्या निवासस्थानी माजी आमदार मोहन सत्कर

पाथरी येथील. सईद खान ऊर्फ गब्बर भाई यांच्या निवासस्थानी माजी आमदार मोहन भाऊ फड यांनी सदिच्छा भेट दिली असता गब्बर भाईचे मोठे बंधू आसेफ खान यांनी त्यांचा जंगी सत्कर केला.
या भेटी व सत्कार कार्यक्रमाच्या वेळीं आसेफ खान यांनी आपले विचार मांडताना पाथरी शहरातील जनतेच्या समस्यांचा उल्लेख केला आणि शहरवासीयांच्या समस्या दूर करण्यााठी व शहरातील युवकांना रोजगार

निर्मितीसाठी मोहन भाऊ फड यांना सहकार्याची विनंती केली असता या विनंतीला स्वीकारून मोहन भाऊ फड यांनी नक्किच कोणताही भेद भाव न करता जनतेच्या सेवे करिता व उद्योगधंदे उभारणीतून रोजगार निर्मितसाठी यांनी त्यांचे सदैव सहकार्याचे चे आश्वासन दिले. तसेच आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा इत्यादी निवडणुका संदर्भात विचार मांडले.


या कार्यक्रमाला समाज सेवक वहिद बेग, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष खुर्शिद शेख,पत्रकार एल.आर. कदम,पत्रकार राजकुमार कांबळे, समाज सेवक युनूस खुरेशी,समाज सेवक दिलीप हिवाळे, रईस भाई अनसारी,फारुख दादा अनसारी,पप्पू नखाते,आमोल बोराटे,मुंजा भाऊ शिनगारे,जफर दादा फरोखी तसेच या कार्यक्रमाला गब्बर भाईचे समर्थक व मित्र तसेच व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Share now