ताज्या घडामोडीमनोरंजन

सतिश होलगे यांची शिवसेना उपतालुका प्रमुख पदी निवड

अंबड /प्रतिनिधी : हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, यांच्या आदेशानुसार अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते सतीश होलगे पाटील यांची शिवसेना अंबड तालुका उपप्रमुख पदी निवड झाली आहे. सदर निवड शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर

,सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे,हिकमतदादा उढान साहेब , जिल्हाप्रमुख ए .जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे,माजी जिल्हा प्रमुख भाऊसाहेब पाऊलबुद्धे, उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर , उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे, तालुका प्रमुख अशोककाका बरडे यांच्या हस्ते करण्यात आली. सतिष होलगे पाटील हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे .गोर गरीबांच्या मदतीला , मित्रांच्या मदतीला संकट काळी नेहमी ते

धावून येतात.सामाजिक , शैक्षणिक , राजकीय , उद्योग क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे .अनेक वर्षा पासून शिवसेना कार्यकर्ता म्हणून उत्तम कार्य केलेले सतिश होलगे यांना अंबड तालुका उपप्रमुख पदाची धुरा देण्यात आली. समाजात राहून सर्वच घटकाला सोबत घेऊन काम कारणारं आक्रमक नेतृत्व मिळालं आहे.होलगे यांच्या निवडीमुळे तळागाळातील माणूस शिवसेना ला जोडला जाणार आहे.यामुळे तालुक्यातील अनेक गावातील मित्र, अपेष्टांनी सतिश होलगे पाटील यांना निवडी बद्दल शुभेच्या दिल्या आहेत.

Share now