ताज्या घडामोडीमनोरंजन

समाजबांधवांनी व्यवसायात उतरले पाहिजे डॉ.रिठ्ठे. सेलूत जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

परभणी प्रतिनिधी. भविष्यातील आव्हाने ओळखून समाजबांधवांनी व्यवसायात उतरले पाहिजे हीच खरी काळाची गरज आहे असे प्रतिपादन आफ्रोटचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ. हनुमंत रिठ्ठे यांनी व्यक्त केले.
आफ्रोट आयोजित सेलूतील साई नाट्य मंदिरात क्रांतिसूर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त दि.२० नोव्हेंबर रोजी समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

भगवान बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गणेश अंभुरे तर मंचावर आप्पाराव बोथीकर, प्रा.परसारम कपाटे, राजेभाऊ काळे, बालाजी मोरे, भारत पवार, रंगनाथ काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.रिठ्ठे म्हणाले की, भविष्यात येणारे आव्हान पेलण्यासाठी येणाऱ्या पिढीला सक्षम बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा घेऊन

खंबीरपणे पुढे जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. यावेळी आप्पाराव बोथीकर, प्रा.परसारम कपाटे, कु. अंजली पवार, सौ.रेखा ढाकरे यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी संध्या पवार, गोविंद काळे, सुशील डुकरे, डॉ. प्रतिक कपाटे, कु. शीतल बेल, कु. वैशाली पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आफ्रोटचे सचिव आनंद माहोरे, सूत्रसंचालन आफ्रोटचे अध्यक्ष मंताजी ढाकरे यांनी तर आभार विठोबा भिसे यांनी मानले. कार्यक्रमास रिठ्ठे, गंगाधर वानोळे, घोगरे, धनवे, चिकाळकर, माघाडे, बळवंते, अर्जुन चिभडे, तोरकड, साबळे, यलदरे, गणेश बेले, पोटे, जयंत काळे, डॉ.डाखुरे, केशव बेले, मारोती कपाटे, गणेश बेले, प्रकाश काळे, गजानन ढाकरे, आम्ले, खंदारे आदी कर्मचाऱ्यांसह महिला आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share now