आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

सम्मेद शिखर्जीला पर्यटन स्थळ बनविल्याने

जैन समाजाने पुकारलेल्या अंबड बदला उत्स्फूर्त प्रतिसाद.अंबड

अंबड प्रतिनिधी :- अनादी काळापासून चालत आलेला जैन धर्म हा पुरातन आणि स्वतंत्र धर्म संहिता मानणारा जैनधर्म आहे. या धर्मातील २४ तीर्थंकरापैकी २० तीर्थंकर श्री सम्मेद शिखरजी या क्षेत्रावरून मोक्षास प्राप्त झालेले आहे या धर्मातील २४ तीर्थंकर यापैकी २० तीर्थंकर ज्या सिद्ध क्षेत्रावरून मोक्षास प्राप्त झाले ते झारखंड येथील श्री सम्मेद शिखर्जी सिद्ध क्षेत्र अत्यंत पवित्र स्थान आहे या ठिकाणी देशातूनच नाही

तर देशाबाहेरील भाविक दर्शन व परिक्रमा करण्यास येतात,अशा पवित्र तीर्थस्थळास केंद्र व राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत परिपत्रक काढले आहे या निर्णयाच्या विरोधात सकल जैन समाजात प्रचंड नाराजी दिसून येत आहे हा घेतलेला निर्णय परत घेण्यात यावा यासाठी सकल जैन समाज अंबड तालुका कडून आज बंद पुकारण्यात आला आहे. देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म,केंद्र सरकार,

महाराष्ट्र सरकार यांनी याबाबत लक्ष वेधून घ्यावे पर्यटन स्थळाचा दर्जा मागे घेऊन श्री सम्मेद शिखरजीला तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे म्हणून सकल जैन समाज बांधवांच्या वतीने तसेच सर्वपक्षीय संघटना व्यापारी महासंघ आदींनी या अंबड बदला पाठिंबा देत निघालेल्या मोर्चात सहभागी झाले हा मोर्चा १००८ भगवान महावीर मंदिरापासून सुरू होऊन महाराष्ट्र द्वार,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक मार्गे, तहसील कार्यालय येथे पोहोचला. तहसीलदार गौरव खैरनार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की सदरील तीर्थस्थळास पर्यटनाचा दर्जा देऊन या ठिकाणी व्यापारी संकलन उभे केले जाण्याचे षडयंत्र असल्याने जैन समाजाचा याला तीव्र विरोध आहे. म्हणून सदरील निर्णय परत घेण्यात यावा या मागणीसाठी सकल जैन समाजाने अहिंसक पद्धतीने आज बंद पुकारून विरोध दर्शविला आहे अंबड शहर बंद ठेवून सकल जैन समाजाने तहसीलदार मार्फत महाराष्ट्र शासनाला एक निवेदन दिले आहे

या निवेदनात पडले आहे की आम्ही सकल जैन समाजाचे धार्मिक भावना लक्षात ठेवून महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार व झारखंड सरकार पर्यटन स्थळाबाबतचा घेतलेला निर्णय रद्द करण्याबाबत उद्बोधित करावे. यावेळी तालुक्यातील सकल जैन जैन बांधवासह इतर सर्व समाजानेही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Share now