आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

सहा कोटी ९१ लाखाच्या ६० कामांना स्थगिती.महाराष्ट्र शासनाचे आदेश

परभणी जिल्हा परिषदचे सहा कोटी ९१ लाखाच्या ६० कामांना स्थगिती

परभणी जिल्हा प्रतिनिधी.
परभणी जिल्हातील पाथरी. मानवत तालुक्यातील गाव अंतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे लेखाशीर्ष ( २५/१५.१२३८ ) या योजनेअंतर्गत सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी परभणी जिल्हा परिषदेला विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने ६९१.०० लक्ष रक्कमेच्या ६० कामांना मान्यता देण्यात आली होती.

परंतू काही कारणास्तव पुढील आदेश होई पर्यंत या कामांना तुर्त स्थगिती देण्याचे आदेश महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे कार्यासन अधिकारी अभिजित तेलवेकर यांनी काढले आहेत.ग्रामविकास विभागाच्या लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायती अंतर्गत गावांना मुलभुत सुविधा पुरविणे लेखाशीर्ष ( २५१५, १२३८ ) या योजने अंतर्गत सन २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठी परभणी

जिल्हयातील ग्रामपंचायतीसाठी १३ एप्रिल २०२३ रोजीच्या उपरोक्त शासन निर्णयान्वे जिल्हा परिषद परभणी यांना ६९१.०० लक्ष रक्कमेच्या ६० कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये पाथरी तालूक्यातील सारोळा ( बु ), तुरा, बांदरवाडा, रेणापूर, विटा ( बु ), फुलारवाडी, सिमुरगव्हाण, झरी, देवेगाव, कासापूरी, पाटोदा ( गं. कि. ), पाथरगव्हाण ( बु ), बाभळगाव, उमरा, लोणी, कानसुर, डाकूपिंपरी,

तारूगव्हाण, ढालेगाव, गोपेगाव, वरखेड, पोहेटाकळी, देवनांद्रा, डोंगरगाव, आनंदनगर, रेणाखळी, रामपूरी ( खु ), मंजरथ,नाथरा, जवळा झुट्टा, हादगाव, चाटे पिंपळगाव, टाकळगव्हाण, समर्थनगर, लिंबा, गुंज ( खु ), निवळी व मानवत तालूक्यातील कोल्हावाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.परंतू सदरील ग्रामपंचायती अंतर्गत मंजुर करण्यात आलेली कामे पुढील आदेश होई पर्यंत तुर्त स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश

मंगळवार १८ एप्रील रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी अभिजित तेलवेकर यांनी एका पत्राद्वारे परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काढवले आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

Share now