ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

साई जन्मस्थान मंदिर येथे दिपावली उत्सव उत्साहात साजरा

संपादक अहमद अन्सारी. श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे लॉकडाऊन नंतर प्रथमच दिपोत्सव साजरा होत आहे. दिपावलीचा पहिला दिवस शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी वसुबारसेला मंदिर प्रमुख सौ छाया कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी अॅड.मुकुंद चौधरी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अश्विनी चौधरी, सौ कलाबाई कांबळे, सुजाता डहाळे आणि शिवकन्या नागठाणे यांनी गो शाळेत परमपूज्य श्री साहेबांच्या गाईची व वासराची पूजा केली.

श्री साई स्मारक समिती पाथरी च्या वतीने दिपावली निमित्त सर्व सेवेकरांना फराळाचे वाटप करण्यात आले. सर्व सेवेकऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले तसेच ऑक्टोबर महिन्याचा पगार ऍडव्हान्स देण्यात आला. सोमवार दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी समितीचे कार्यकारी अधिकारी अॅड. मुकुंदराव चौधरी यांच्या शुभ हस्ते साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला. प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त अॅड. अतुल चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी ना.के. कुलकर्णी, मंदिर प्रमुख सौ छाया कुलकर्णी तसेच सर्व सेवेकरी उपस्थित होते, त्यानंतर रात्री नऊ वाजता शेजारती

झाली.निराशेचा अंधकार दुर करुण आशेचा प्रकाश पसरवण्यासाठी श्रीसाईबाबांनी शिर्डी मध्ये दिपौस्तवाची सुरुवात केली होती. तिच परंपरा पुढे चालवण्यासाठी साई भक्त, साई मंदीर विश्वस्त मंडळ व अंजली समूहाने तत्कालीन मालक कै. रामभाऊ कोक्कर यांनी 2008 पासुन दिपौस्तवची परंपरा साई जन्मभूमी पाथरी इथे सुरु केली. केवळ पाच पणती पासुन सुरु झालेली

पाथरी येथील ही संस्कृती साई भक्त आजही उत्साहाने साजरी करत आहेत. आणि ही परंपरा अविरत चालू राहावी म्हणून आज बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत श्रीमती तनुजा रामभाऊ कोक्कर, अंजली समूह अंजली हॉटेलचे मालक – श्री रवि भैय्या कोक्कर, रोहित भैय्या कोक्कर यांच्यावतीने दिपोस्तव कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला भक्तजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे समितीच्यावतीने आवाहन करण्यात आले. अशी माहिती श्री प्रताप आम्ले यांनी दिली

Share now