सुजलेगाव च्या सज्जन सुभाष ला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर नायगाव तालुक्यातील सुजलेगाव नगरीचे भूमिपुत्र सज्जन सुभाष भिमराव यांना आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, शासनासह विविध संस्थेमार्फत दरवर्षी विविध पुरस्कार वितरण करण्यात येते त्या अनुषंगाने दि.२५/०७/२०२१ रोजी शब्दगंध शब्दसमूह प्रकाशन औरंगाबाद व आम्रपाली प्रकाशन आंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला त्यामध्ये प्राध्यापक प्रा.डॉ. रमेश जाधव सर (सदस्य
मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद), डॉ.श्री ज्ञानेश्वर माशाळकर सर (सदस्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य) व मा.प्राची साठे (माजी विशेष कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभाग, मंत्रालय महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व शाल श्रीफळ देऊन सज्जन सुभाष भिमराव सुजलेगावकर यांचा गौरव करण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध क्षेत्रांमधील मान्यवरांना पुरस्कार
वितरण करुन सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये मौजे सुजलेगाव येथील सज्जन सुभाष भिमराव यांना आंतरराष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्कार २०२१ प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मित्र योगेश गणपतराव गिरबणवाड धुप्पेकर हा देखील उपस्थित होता, त्याबद्दल त्यांना गावकऱ्यांकडून व समाजातील सर्व मित्र मंडळ व मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे…नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर जाहिरात साठी व बातमी साठी संपर्क साधावा मोबाईल नबरः 9960484886