आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

स्वतःची उंची वाढवण्याच्या नादात लोकप्रतिनिधींना पुलाच्या उंचीचा विसर

स्वतःची उंची वाढवण्याच्या नादात लोकप्रतिनिधींना पुलाच्या उंचीचा विसर- सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड प्रतिनिधी. जनमानसात स्वतःची उंची वाढवण्याच्या नादात परिसरातील लोकप्रतिनिधी या पुलाची उंची वाढवण्यास विसरले, त्याचे परिणाम या शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशी प्रतिक्रिया शनिवारी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पाण्याखाली गेलेल्या सुनेगाव

सायला येथील पुलावरून बोलताना व्यक्त केली.सखाराम बोबडे पडेगावकर व त्यांचे सहकारी मशनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता सुनेगाव येथील गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेलेल्या पूलाची पाहणी केली. यावेळी या धोकादायक पाण्यातून ये जा करणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना बोबडे म्हणाले की

स्वतःची उंची वाढवण्याच्या नादात परिसरातील लोकप्रतिनिधी पुलाची उंची वाढवण्याचा विसरून गेले. त्याचे परिणाम या भागातील लोकांना भोगावे लागत आहेत . हा कमी उंचीचा पूल पाण्या खाली गेल्यामुळे या भागातील दहा ते पंधरा गावचा तालुका व जिल्हा शी संपर्क तुटला असून भाजीपाला, दूध उत्पादन, शाळा ,महाविद्यालय,

आरोग्य आधी बाबीवर त्याचा परिणाम होत आहे .तरी या फुलाची उंची वाढवण्याची मागणी यांनी केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या पुलाची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

Share now