ताज्या घडामोडीमनोरंजन

स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रा. पं. कोलंबी च्या वतीने माजी सैनिक, स्वातंत्र सैनिक व कोरोना योद्धा यांचा सत्कार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी : – सय्यद अजिम नरसीकर ग्रा. पं. कार्यालय, कोलंबी च्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कोलंबी येथील माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक व कोरोना योद्धा यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमामध्ये मा. सैनिक, शहीद विनोद बैस, नाथा बाबा इंदूर्ले, बाळासाहेब तानाजी बैस, हणमंत तानाजी बैस, शिवाजी बळीराम बैस, रमजान अहमदसाब शेख, मदन व्यंकटी बैस, राजाराम मारोती चिंतेवाड, उद्धव बळीराम बैस, स्वातंत्र्य सैनिक, लक्ष्मीबाई किशन लाठकर तसेच उपकेंद्र येथील डॉ.स्मिता मारकवाड व कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सरपंच शेशिकलाबाई गोविंदराव बैस,

उपसरपंच देऊबाई गवाले, ग्रा. पं. सदस्य, अनिता तुळशीदास बैस, संगीता अशोक सोनमनकर, नागरबाई शिवाजी शिंदे, संजना शिवाजी लांडगे, धोंडुबाई जयवंत बर्लेवाड, फेरोज बंदगीसाब शेख, नबीसाब चांदसाब शेख, भगवान केरबा लांडगे, यदवत्ता साहेबराव मुधळे तसेच दादाराव पा. शिंदे, सुदाम लांडगे, विजय बैस, शिवदत्त पोतलवाड, हणमंतराव शिंदे, मारोती डुबुकवाड, किरण शिंदे, ज्ञानोबा बैस, जयवंत बर्लेवाड, शिवाजी शिंदे, प्रल्हाद बैस, ज्ञानोबा गवाले, मधुकर मलबा बैस, नरसिंग बैस, चंद्रकांत चिंतेवाड, आदम शेख, मोहसीन शेख इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी टी .जि. रातोळीकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण पा. बैस यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं. चे कारकुन श्री. लक्ष्मीकांत कोत्तावार, संगणक परिचालक हणमंत कोकुर्ले, ग्रा. पं. सेवक रामन कोकुर्ले, शेषेराव कोकुर्ले,दिनेश संपतवार इत्यादी नी सहकार्य केले.

Share now