ताज्या घडामोडीमनोरंजन

स्वातंत्र संग्रामातील मुस्लिम समाजातील सर्वच स्वातंत्र सैनिक व समाज अखंड भारताचे पक्षधर होते. आमदार बाबाजानी दुर्राणी

सेलू शहर प्रतिनिधि सेलू:- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वच धर्म बांधवांनी तन, मन, धनाने आपले योगदान दिले असून वेळ प्रसंगी प्राणाची आहुती दिली आहे. या स्वातंत्र्य सैनिकांपैकी अनेक स्वातंत्र्य सैनिकांची माहीती आजच्या युवा पिढिला ज्ञातच नाही.करोडों मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांची माहीती ही शासन दरबारी फायलींमध्ये बंदिस्त झाली असुन अनेक स्वातंत्र्य सैनिकांची माहीती पुस्तक रुपाने उपलब्ध असली तरी मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्या कारणाने ती माहीती समाजाच्या सर्व

सामान्य नागरीकांपर्यंत पोहचू शकली नाही. परिणामी मुस्लिम समाज आपल्याच समाजातील स्वातंत्र्य सैनिकांच्या माहीती पासुन अलिप्त आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठि मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याची माहीती आजच्या पिढिला व्हावी व त्यांच्यापासुन प्रेरणा घेऊन राष्ट्रप्रेमी, राष्टनिष्ट्र, राष्ट्रभक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने येथील युथ फोरम तर्फे करोडों मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांपैकी काही निवडक मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांच्या

सचित्र माहीतीचे प्रदर्शन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंधरा ऑगस्ट रविवार रोजी हुतात्मा स्मारका समोर सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजे पर्यंत आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार अब्दुल्ला खान( बाबाजानी ) दुर्रानी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आद्य क्रांतिकारक टिपू सुलतान हे होते, त्यांना तत्कालीन राज्यकर्त्यांनी सहकार्य केले नाही हे दुर्देवी होते. तसेच सर्वच मुस्लिम स्वातंत्र सैनिक व मुस्लिम समाज हा भारत अखंड राहावा या मताचे होते.

या प्रदर्शनास आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार मेघनाताई साकोरे ( बोर्डीकर ), नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष पवनराजे आढळकर, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, मनिष कदम मिलिंद सावंत, शेख राज,विनोद तर्टे सह अनेक पत्रकार, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते अदि

मान्यवरांनी भेटि दिल्या. नगरसेवक शेख रहीम, शेख अय्युब भाई, अजिम कादरी, शेख महेमुद सर, एड. विष्णू ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली युथ फोरमचे शेख साजीद, शेख मुखिद, करीम खान, डॉ. मुताहेर, बाबर बेग, अन्सारी माज, हसन खान, शेख साजीद बेलदार , सिद्दिकी मोईन, शोहेब हाश्मी यांनी आयोजन केले होते.

Share now