मनोरंजनमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

हुनगुंदा के.प्रा.शाळेच्या वतीने दिव्यांगांचा सन्मान

कुंडलवाडी प्रतिनिधी:कुंडलवाडी शहरापासुन सहा किमी अंतरावर असलेल्या हुणगुंदा येथील केंद्रीय प्रार्थमिक शाळेत दिव्यांगदिन काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कुंडलवाडी पासून जवळच असलेल्या हुनगुंदा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्रार्थमिक शाळेत

दिनांक .३ डिसेंबर रोजी सकाळी या शाळेचे मुख्याध्यापक रामपुरे एल. एल. यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय पहीली ते सातवी वर्गातील विद्यार्थांची गावातील मुख्ये रस्त्याने मिरवणुक काढून दिव्यांगाच्या घरी जाऊन दिव्यगांचा सन्मान पूर्वक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमास सहशिक्षक काळेसर चिलखेवाड, नरावाड, सौ. सरपंच प्रतिनिधी प्याटेकर नागेश, मुंगडे नारायण पाटील.व गावातील अनेक व्यक्ती ही यावेळी उपस्थित होते.

Share now