आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

अता मिळणार धान्याऐवजी बँक खात्यात थेट रक्कम

परभणी जिल्हा प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गंत समाविष्ट न झालेल्या केशरी ए.पी.एल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रतिव्यक्ती दीडशे रुपये थेट हस्तांतरण योजनेनुसार लाभ मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकताच २८ फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन निर्णयानुसार निर्गमित केला आहे.

परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना योजनेच्या लाभासाठी रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम आर.सी.ची नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिका धारकांनी डीबीटीसाठी आवश्यक बँक खात्याचा विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित रास्तभाव दुकानदार, तलाठी यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावा. त्या अर्जात अचूक माहिती भरून तो स्वस्त धान्य दुकानदार,तलाठी किंवा तहसील कार्यालयात जमा करावा.

अर्ज जमा करताना त्यासोबत शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत,बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, शिधापत्रिकेतील कुटूंब प्रमुखाचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असेल त्याची छायांकित प्रत जोडून द्यावी.या योजनेंतर्गंत वितरीत करण्याची रक्कम महिला कुटुंबप्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारक महिला कुटुंबप्रमुखाचे बँक खाते नसेल तर त्यांनी नवीन बँक खाते काढून घ्यावे. व त्याची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा यांनी केले आहे.

Share now