ताज्या घडामोडीमनोरंजनराजकिय घडामोडी

आमदारांची कामगिरी दमदार.विविध विकास कामांचा भूमिपूजन

गंगाखेड प्रतिनिधी. मौजे धारखेड येथे आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून पूर्णत्वास आलेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा साहेबांच्या शुभहस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाला. त्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन,

गौण खनिज निधीतून बहुपयोगी व्यासपीठ व मुलींचे स्वच्छतागृह, 15 व्या वित्त आयोगातंर्गत वॉटर फिल्टरचे लोकार्पण यांचा समावेश आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव चोरघडे, माजी सभापती बालासाहेब निरस, सोनपेठचे माजी सभापती श्रीकांतराव मोरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, राजेभाउ बापू सातपुते,

नामदेवराव निरस, प्रा.मुंजाजी चोरघडे, उध्दवराव चोरघडे, शासकीय गुत्तेदार महंम्मद खमरोद्दीन, अक्षय चकोटे, गोपीनाथ भोसले, उध्दवराव खुपसे, ज्ञानेश्वर भुमरे, बालाजी लिंगायत तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share now