आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

परभणी हिंगोली पेडगांव येथे इज्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात

परभणी जिल्ह्य प्रतिनिधी. पेडगांव येथे होणार तब्लिगी इज्तेमा परभणी हिंगोली तब्लिगी जिल्हास्तरावर इज्तेमा शहरापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावरील पेडगांव येथे दिनांक ७ डिसेंबरपासून दोन दिवसीय तब्लिगी इज्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या धार्मिक इज्तेमा साठी लाखोंच्या संख्येत भाविकांची उपस्थिती राहणार आहे कळते.

इज्तेमासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळावे म्हणून पेडगावसह जिल्ह्यातील विविध भागातून हजारो स्वयंसेवक दिवस रात्र यासाठी परिश्रम घेत आहे. दोन दिवसीय इज्तेमा मध्ये विविध प्रतिष्ठित उलेमाच्या उपस्थितीत अल्लाहची भक्ती तसेच अल्लाहचे शेवटचे प्रेषित (दूत) मुहम्मद पैगंबर यांची शिकवण याविषयी प्रमुख उलेमा स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

पेडगांव येथे जवळपास ५० ते ६० एकरात नियोजनबद्ध बसण्यासाठी सभामंडप उभारण्यात आला आहे मुख्य सभामंडपात एकाच वेळी लाखांपेक्षा अधिक स्वयंसेवक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे अद्वितीय अशी पार्किंग व्यवस्था इज्तेमात येणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे पार्किंग सांभाळण्यासाठी हजारो स्वयंसेवकांना दोन्ही बाजूंनी जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे तसेच पेंडॉलमध्ये व्यवस्थेसाठी स्वयंसेवक राहणार आहे इज्तेमासाठी स्वच्छतागृह उभारणे ,

लाईट , ध्वनियंत्रणा अदी काम जोमाने सुरू आहे पेडगांवसह परिसरातील शहरातील अनेक स्वयंसेवकांना स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाविकांना वजुसाठी धुण्यासाठी व स्वच्छतेसाठी व्यवस्था गुसलखाने ,जेवणासाठी दावत सहा झोन बनविण्यात आले असुन प्रतियेक झोनमध्ये एका वेळी हजारो भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे

इज्तेमा स्थळी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू राहावा म्हणून उच्च क्षमतेचे विद्युत ट्रान्सफार्मर तसेच विज पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास यासाठी जनरेटर बसविण्यात आले मैदानाच्या चारही बाजूंनी अद्ययावत ध्वनियंत्रणा , चोहीकडे रोषणाई साठी फोकस बसवीण्यात आले आहे. इज्तेमा ठिकाणी कुणी आजारी किंवा दुखापत झाल्यास पडल्यास त्यासाठी रुग्णालय सह उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, औषधोपची व रूणवाहिकाची व्यवस्था केली जाणार आहे.

इज्तेमात मुस्लिम समुदायातील पारंपरिक पद्धतीने सामूहिक विवाह पार पाडण्यासाठी अनेकांनी विवाहासाठी नोंद केली असुन सध्या यासाठी नोंदनी सुरू आहे. दोन दिवसीय राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमा ठिकाणी उलेमा धर्म गुरू या इस्माल धर्माची शिकवण यावर विचारमंथन होणार आहे व मुस्लीम समाजबांधवांना मार्गदर्शन करणार असून ८ डिसेंबरला मगरीब नमाज अदा केल्यानंतर सर्वांच्या सुख शांती साठी सामूहिक मोठी दुआ झाल्यानंतर नियोजना प्रमाणे इज्तेमाची सांगता केली जाणार आहे.

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नेते मंडळाची इज्तेमास्थळी भेट परभणी हिंगोली दोन होणाऱ्या दिवसीय जिल्हास्तरीय इज्तेमा ठिकाणी पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आ. सुरेश वरपुडकर , मा.आ.विजय भांबळे , प्रताप देशमुख आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी होणाऱ्या इज्तेमा स्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली .

Share now